• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील चोरीचा पोलिसांनी चार तासात ठोकल्या चोरट्यांना बेड्या !

editor desk by editor desk
October 12, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील चोरीचा पोलिसांनी चार तासात ठोकल्या चोरट्यांना बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील सेंट्रल बँक कॉलनीतील एक परिवार अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्याची संधी साधत बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात चार संशयित चोरट्यांच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला. दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर माहोरे यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. लोखंडी कपाट तोडून लांबविला ऐवज चोरट्यांनी किरण माहोरे यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाल्यानंतर संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (१८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (२२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (२५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांना तासाभरात अटक केली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पो. नि. शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.

Tags: #jalgaon#policeCrime
Previous Post

प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

Next Post

विमानात अभिनेत्रीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न !

Next Post
विमानात अभिनेत्रीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न !

विमानात अभिनेत्रीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group