• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

नशिराबाद नजीक सायंकाळी झाला अपघात 

editor desk by editor desk
October 12, 2023
in क्राईम
0
प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात : महिला ठार तर ४ जखमी !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना एक भीषण अपघात नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिक्षात कलर घेवून मोताळा येथे जात असलेल्या रिक्षाला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) या जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३ ) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली. कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात रिक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.

Tags: #accident#policenashirabad
Previous Post

पोलीस भरतीची करत होती तयारी अन घरात केले ते धक्कादायक !

Next Post

जळगावातील चोरीचा पोलिसांनी चार तासात ठोकल्या चोरट्यांना बेड्या !

Next Post
जळगावातील चोरीचा पोलिसांनी चार तासात ठोकल्या चोरट्यांना बेड्या !

जळगावातील चोरीचा पोलिसांनी चार तासात ठोकल्या चोरट्यांना बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group