Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी आमदार .बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !
    क्राईम

    माजी आमदार .बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 10, 2023Updated:October 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    अमळनेर तालुक्याचे माजी आ.बी.एस.पाटील यांच्या चारचाकीचा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी सुदैवाने चारचाकी गाडीमध्ये माजी आ.पाटील हे नव्हते तर त्यांचे चालक असल्याचे समजते. हा अपघात नवलनगर जवळ दि.१० ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धु‌ळे येथून सर्व्हिसिंग करून येत असलेल्या माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या वाहनाला नवलनगर जवळ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील नव्हते. केवळ चालक होता. तर गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्याने चालकही किरकोळ जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांची गाडी (एमएच-१२, डब्ल्यू ३२३२) ही मंगळवारी धुळे येथे सर्व्हिसींगसाठी चालक दिनेश धनगर हे घेऊन गेले होते. सायंकाळी ४.४५ वाजता गाडीची सर्व्हिसिंग करून अमळनेरकडे येत असताना नवलनगर जवळील पुलाच्या कठड्याला ही गाडी ठोकली गेली. यात सुदैवाने डॉ. बी.एस. पाटील नव्हते. तसेच गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघल्याने चालक धनगरही बालंबाल बचावले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.