• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका!

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 10, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य, शैक्षणिक, सामाजिक
0

नाशिकमध्ये अमली पदार्थांचे साठे सापडल्यानंतर आ. तांबे यांचा इशारा – पोलीस महासंचालकांना पत्र, भरारी पथके तैनात करण्याची मागणी

एकीकडे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा सापडला असताना दुसऱ्या बाजूला शाळेजवळील सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्या महापालिकेच्या मदतीने हटवणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होणे, ही बाब चिंताजनक आहे. नाशिकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची गरज आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. ‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका, असं आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

राज्याच्याच नाही, तर देशाच्या नकाशावर तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या नाशिकला लाभलेला सांस्कृतिक वारसाही थोर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे साठे सापडण्याच्या घटना घडल्या. यात तब्बल ३५० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ मुंबई आणि नाशिक पोलिसांनी जप्त केले. अमली पदार्थांचा प्रश्न फक्त एका शहरापुरता मर्यादित नसून तो राज्यभरात पसरलेला आहे. त्यामुळे ‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका, असा इशाराही आ. तांबे यांनी दिला.

मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये शाळांच्या जवळ असलेल्या पानटपऱ्या किंवा छोटी दुकाने येथे अमली पदार्थ विकण्याच्या घटना याआधी उघडकीस आल्या होत्या. शाळांमधील किशोरवयीन आणि लहान मुलांना व्यसनाधीन करून अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचे प्रकार घडले होते. पुण्यातही अशा घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एवढा मोठा साठा सापडत असेल, तर नाशिकच नाही, तर राज्यभरातील पालक, शाळा प्रशासन आणि पोलीस या सर्वांनीच सावध राहायला हवं, अशी गरजही आमदार सत्यजीत तांबे यांनी बोलून दाखवली.

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी सर यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेला शाळांबाहेरील या सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर हे ड्रगचे साठे जप्त झाले. त्या पाठोपाठ कुलकर्णी सरांवर प्राणघातक हल्ला झाला. या सर्व गोष्टी एकमेकींशी जोडलेल्या नाहीत ना, याचाही तपास होणं आवश्यक असल्याचं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं.

पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणे शाळा प्रशासनानेही त्यांच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली घडतात का, याकडे लक्ष द्यायला हवं. मुंबई पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांबाहेरील या पान टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी भरारी पथकं स्थापन केली होती. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात पोलिसांनीही अशी पथकं तयार करावी, अशी मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

हा देशाच्या भवितव्याला धोका!

आपला देश तरुणांचा देश असल्याचं आपण म्हणतो. पण हे तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असतील, तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. सुदृढ तरुण ही देशाची खरी संपत्ती असते. अमली पदार्थांच्या व्यसनापासून आपण तरुणांना आणि खास करून शाळकरी मुलांना वाचवू शकलो नाही, तर तो देशाच्या भवितव्यासाठी मोठा धोका असेल. – आ. सत्यजीत तांबे.

Previous Post

धुणे – भाडे करणाऱ्या दिव्यांग तरुणीवर मालकाचा अत्याचार !

Next Post

तब्बल १४ तासाने सापडला बुडालेला तरुण : दुर्देवाने मृत्यू !

Next Post
तब्बल १४ तासाने सापडला बुडालेला तरुण : दुर्देवाने मृत्यू !

तब्बल १४ तासाने सापडला बुडालेला तरुण : दुर्देवाने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group