जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात भुलाबाई विसर्जन करण्यात येत असतांना जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे देखील संध्याकाळी विसर्जन सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली होती. एक तरुण पाण्यात बुडाला होता. त्या तरुणाला काढण्यासाठी १४ तासांनी यश आले आहे पण दुर्देवाने हा तरुण मयत अवस्थेत मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जन कार्यक्रम सुरु असतांना रमेश चव्हाण हे पाण्यात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती परिषद दल जळगाव यांनी सुरुवात केली परंतु मयत रमेश चव्हाण याचा मृतदेह १४ तास अथक परिश्रम करुन सुदधा हाती लागत नसल्याने शेवटी म्हसावद मंडळ अधिकारी आंधळे यांनी चांगदेव येथील नावाडी आपत्ती व्यवस्थापन टीम यात किशोर भोई, गोपाल भोई,राजु भोई, प्रविण भोई, गजानन भोई, विशाल बोरले, योगेश भोई व गजानन शिवराम भोई यांनी २:४५ वाजता शोध कार्यास सुरुवात केली व ३:१५ला मयत रमेश याचा मृतदेह हाती लागला. या शोधकार्याच्या कामासाठी महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस विभाग व पोलिस पाटील तसेच गावातील नागरिक सकाळी ७:३०पासून घटनास्थळी ठाण मांडुन होते.