प्रतिनिधी जळगाव : कार्यकर्ता विकासाच्या दृष्टीने अभ्यासवर्ग महत्त्वाचा असतो. अभ्यासवर्गाचे स्वरूप प्रांत वर्ग, जिल्हा वर्ग, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग अशा प्रकारे असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्हा अभ्यास वर्ग दि. २० व २१ नोव्हेंबर २०२१ रोजी श्री क्षेत्र मंगळ ग्रह मंदिर, अमळनेर येथे संपन्न झाला. अभ्यासवर्गाचे उद्घाटन प्रांत संघटन मंत्री अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, वर्ग प्रमुख नितेश चौधरी यांच्या हस्ते झाला.
अभ्यासवर्गात अभाविप परिचय व सैद्धांतिक भूमिका, अभाविप कार्यपध्दती, कार्यकर्ता व्यवहार, ORP, मुलाखत, भाषण सत्र, महाविद्यालय काम, प्रवास व संपर्क आदी सत्रांचे नियोजन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या दृष्ट्या करण्यात आले होते. विद्यार्थी परिषदेच्या वर्षभरातील आंदोलने, कार्यक्रम, उपक्रम यांची प्रदर्शनी देखील लावण्यात आली होती. या वर्गासाठी सहा तालुक्यातून एकूण १०६ कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच अभाविप पूर्व कार्यकर्ते, हितचिंतक, प्राचार्य, प्राध्यापक यांचे एकत्रिकरण करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची जिल्हा समिती घोषित करण्यात आली. प्रा. डॉ. मुजाहिद्दीन हुसेन, प्रा. उपासनी मॅडम, प्रा. प्रतिमा याज्ञिक व २० कार्यकर्ते या समिती मध्ये आहेत. या समिती मार्फत भारतीय गौरवशाली इतिहासाची सामान्य ज्ञान स्पर्धा, ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे सर्वेक्षण व जीवन चरित्र लिखाण, प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभर तिरंगा पदयात्रा, नमन करो इस मिट्टी को इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन या समितीच्या अंतर्गत करण्यात आली.
अभ्यास वर्ग समारोप अभाविप जळगाव जिल्हा संघटन मंत्री ज्ञानेश्वर उद्देवाल यांनी एकंदरीत वर्गाचा आढावा घेत केला. अभ्यासवर्गात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.