शिरसोलीनजीक वसंतवाडी येथे घडली घटना
प्रवीण पाटील लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी: जळगाव तालुक्यातील शिरसोलीनजीक असलेल्या वसंतवाडीत ४१ वर्षीय प्रौढाने सायंकाळी ५:३० सुमारास काठेवाडी वाड्याजवळ धरणात बुडाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत रमेश भिवा चव्हाण हे बुडाले असून त्यांच्या शोधासाठी प्रशासनाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज तांडा येथील मुली या धरणावर भुलाबाई विसर्जन करण्यासाठी गेलेल्या होत्या तेथे रमेश चव्हाण हा तरुण त्या मुलींनजवळुन भुलाबाई घेऊन धरणाच्या पाण्यात विसर्जिन करून पोहत येत असतांना धरणाच्या मध्यम भागात आल्यावर अचानक बुडत असल्याचे धरणाच्या काठावर उभ्या असलेल्या युवकांच्या लक्षात आले त्याने व तेथे उपस्थित मुलींनी ही माहिती गावात कळवली त्यानंतर धरणावर मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली व स्थानिक पोहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.प्रदिप पाटील, पो.हे.कॉ.स्वप्नील पाटील घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली त्यानंतर जळगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दिलीप बारी त्यांच्या सोबत म्हसावद मंडळ अधिकारी आंधळे भाऊसाहेब व वसंतवाडी तलाठी नितिन ब्याळे हे घटनास्थळी आले व पोलिस पाटील संजय चिमणकारे यांच्या कडुन माहिती घेऊन घटनास्थळी पाहणी केली अंधार असल्याने शोध कामात अडथळा निर्माण होत असल्याने ७:१५पर्यत बुडालेला तरुण मिळुन आला नाही त्यामुळे शोध कार्य बंद करण्यात आले रात्री ८:००पर्यत महसूल व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील हे घटनास्थळी होते