जळगाव : प्रतिनिधी
जागतिक मानसीक आरोग्य दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती ,युवाशक्ती फाउंडेशन आणि शहरात गाऊ आनंदाची गाणी या कार्यक्रमाचे आयोजन 10 ऑक्टोबर संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आलेले आहे .मानसशास्त्र सांगते की गाणी गायल्यामुळे डान्स केल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आपल्या मेंदूमधील हॅपी हार्मोनची वाढ होत असते .व्यक्ती आनंदी होत असतो .आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला तान तणावांना सामोरे जावे लागते .अधिकच्या ताणतणावामुळे माणूस आनंदापासून पारखा होतो . असे म्हणतात आनंदी मन यश खेचून आणते . मनाला आनंदी करण्या करताच जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून काव्यरत्नावली चौकामध्ये मनसोक्त आनंदी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . ह्या कराओके गाण्यांच्या कार्यक्रमात शहरातील प्रत्येक जण आपल्या आवडीचे गाणे गाऊन आनंदाची अनुभूती घेणार आहे .चला तर मित्रांनो आपण सगळ्यांनी या उत्स्फूर्त कार्यक्रमात सहभाग नोंदवायचा आहे आणि मनसोक्त गाणी म्हणायची आहे .
चेतना व्यसनमुक्ती केंद्र ,युवाशक्ती फाउंडेशन आणि युफोरिया आयएफआरएम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेतला आहे . मानसिक आरोग्य दिनानिमित्त हा उपक्रम जळगाव शहरात १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे .
हा गाण्यांचा कार्यक्रम सर्वांसाठी असून महिला, पुरुष, जेष्ठ नागरीक तसेच मुल, मूली देखील यात सहभागी होवू शकतात. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे


