लातूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता यात लातूर जिल्ह्यात देखील खुनाच्या घटनेने हादरून गेला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचा तपास औसा पोलीस करत आहेत.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार लातूर औसा महामार्गावरील कारंजे खडी केंद्राच्या परिसरात इस्माईल मुबारक मणियार (वय 41, राहणार हरंगुळे, ता. जि. लातूर) हे आले हाेते. तेथे त्यांचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केला. मणियार यांच्या डाेक्यात ठेचून मारण्यासह शरीरावर इतरही ठिकाणी गंभीर मारहाण केल्याचे निदर्शानस आल्याचे पाेलीसांनी सांगितले. या खूनाचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. अज्ञातांवर कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या खूनाचा तपास पाेलीस निरीक्षक सुनील रेजितवाडा करत आहेत.