कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज‘:माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली होती. दोन-तीन सुनवाईनंतर न्यायालयाने ठाकूर यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे गुलाबराव देवकरांना ‘सर्वोच्च’ दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यानिमित्ताने देवकर यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. घरकुल प्रकरणी झालेल्या शिक्षेवर आरोपींनी स्थगिती मिळवली होती. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधीच बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.
काय झाले नेमकं कोर्टात
गुलाबराव देवकर यांच्याकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. दोघांनी सांगितले की, याचिकाकर्ता फक्त जळगावचा आहे म्हणून याचिका गृहीत धरता येणार नाही. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीय. तसेच अशा याचिका गृहीत धरण्यात येऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले अॅड. रोहतगी आणि अॅड. निकम यांनी दिले. तसेच अशामुळे भविष्यात कुणीही उठसुठ याचिका दाखल करू शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.