भडगाव : प्रतिनिधी
केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत असताना विजेचा शॉक लागून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुसर्डी येथील विकास धर्मा निकुंभ (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी तो काका राजेंद्र निकुंभ, चुलतभाऊ साई व यश निकुंभ यांच्यासोबत केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत होता. त्याचवेळी त्याला वीज तारेचा शॉक बसला. त्यात तो बेशुद्ध पडला. काका व चुलतभावांनी त्यास कजगाव येथील खासगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे.