Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलाठी कार्यालयातच महिलेसोबत केले अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले अन् गावकऱ्यांनी दिला चोप !
    क्राईम

    तलाठी कार्यालयातच महिलेसोबत केले अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले अन् गावकऱ्यांनी दिला चोप !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती वृत्तसंस्था : येथील पिंपळगाव बैनाई येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. अनेक वेळा तलाठी कार्यालयात गावातील व परिसरातील शेतकरी वर्ग कामानिमित्त येतात. मात्र, तलाठी व त्याच्या काही मित्रांनी एक महिलेला तलाठी कार्यालयात बोलावले. आणि त्याच ठिकाणी त्यांनी अश्लील चाळे सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना जोरदार चोप देण्यात नाला आहे.

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्यानं व त्याच्या काही मित्रानी हा धक्कादायक प्रकार केल्याचं उघड झालं. तलाठी कार्यलयात एका महिलेला आणून तिच्या सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांनी या तलाठ्याला व महिलेला रंगेहाथ पकडून समोर आणला आहे. त्यामुळं तलाठी कार्यालय हे नागरिकांच्या कामांसाठी आहे की अश्लील चाळे करण्याचा अड्डा आहे, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहे.


    अन्.. गावकऱ्यांनी तलाठ्यासह मित्रांना चोप


    पिंपळगाव बैणाई येथील तलाठी कार्यालयातील व्ही भगत या तलाठ्यानं बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला सोबत आणले. सोबतच त्याच्या पाच मित्रांना बोलावून कार्यालयात दारू पिऊन अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात अश्लील चाळे सुरू असल्याची कुजबूज गावातील नागरिकांना लागली. पाच ते सहा नागरिकांनी तलाठी कार्यालय गाठले. या कार्यालयात सुरू असलेला प्रकार पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यामध्ये गावकऱ्यांनी तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला चांगलाच चोपही दिला. यामध्ये तीन मित्र हे पसार झाले आहेत. दरम्यान, तलाठी कार्यालयात असा प्रकार नेहमीच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणंय. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.