नागपूर : वृत्तसंस्था
बँकेत खाते उघडल्यास दर महिन्याला १० हजार रुपये मिळण्याची स्कीम सुरू आहे, अशी एका मजुराला बतावणी करून त्याचे चार बँकेत खाते उघडून दोन भावांनी मिळून त्या खात्यात दोन कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका भावाला अटक केली असून, एक फरार आहे. हि घटना नागपूर शहरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू राजकुमार जाधव (२८) आणि निखिल जाधव (२६) अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी बबलूला अटक केली आहे. मोहन दोडेवार हे मजुरीचे काम करतात. आरोपी दोन्ही भावांनी मोहन यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन मोहनच्या नावावर एचडीएफसी बँक, टेकानाका शाखा, कॅनरा बँक, जरीपटका शाखा, आयसीआयसीआय बँक, जाफरनगर शाखा आणि इन्साफ बँक, पाटणकर चौक शाखा येथे खाते उघडत दोन कोटींचा व्यवहार केला.