Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    Uncategorized

    चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskOctober 8, 2023No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

     

    पिंपळेसीम येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे ७ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन !

     

    जळगाव : प्रतिनिधी

     

    प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करणार असून वाघळू बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. झुरखेडा – खपाट – पिंपळेसिम हा 10 कोटीचा रस्ता तसेच पिंपळेसिम ते बोरखेडा हा 5 कोटी रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे . पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांनी गावाची तहान भागवा. आपण नेहमी निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले आहे . घोडा मैदान जवळ येवू द्या – विरोधकांना सभांमधून निरुत्तर करणार असून पिंपळे सिम वास यांनी आज पर्यंत दिलेले प्रेम कधीही विसरणार नाही असे भावनिक प्रतिपादन शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पिंपळेसीम येथे पूल व रस्ते व आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण व विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी विरोधक व टिका करणाऱ्यांवरही तूफान फटाके बाजी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे हे होते.*

     

    यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या विहीसाठी अजय रामदास जाखेटे यांनी २ गुंठ्ठे जागा मोफत दिल्याने त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     

    *{चौकट }*

    *२०२४ लाही गुलाबभाऊ , तुम्हीच – मान्यवरांच विश्वास*

     

    यावेळी तालुका प्रमुख डी.ओ.पाटील गजानन पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, सरपंच संघटनेचे सचिन पवार , मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पी.एम. पाटील सर व जि.प. सदस्य गोपाल चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना महत्व देऊन मतदार संघाचा कायापालट केला. त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे ते राज्यभर प्रसिद्ध असल्याने त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो . गुलाबराव पाटील म्हणजे गोरगरिबांचा व सर्व सामन्यांचा नेता असल्याचे सांगत सन २०२४ व २०२९ लाही भाऊ तुम्हीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांचे तोंड भरून कौतुक केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थामार्फत शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला. यावेळी सरपंच गोविंदा मोरे, उपसरपंच अरुण पाटील, चेअरमन व्हाईस चेअरमन , ग्रामपंचायत सदस्य व संचालक व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला. गावात विविध ठिकाणी लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

     

    *या कामांचे झाले लोकार्पण व शुभारंभ !*

    पिंपळेसीम येथे३ कोटी ४६ निधीतून नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण,डीपीडीसी अंतर्गत १ कोटी २७ लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण, ८१ लाखाची पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, पिंपळेसीम ते हनुमंतखेडा या रस्त्याचे 1.5 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 80 लक्ष निधी मंजूर असून त्या रस्त्याचा शुभारंभ देखील करण्यात आला. जन सुविधा योजनेतर्गत २२ लक्ष निधी खर्च करून बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालायचे लोकार्पण व मुलभूत सुविधे योजनेतर्गत (२५१५) मधून २० लक्ष निधीतून कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकबसविणे १८ लक्ष, ,गाव हाल बांधकाम , २ लक्ष, अश्या एकूण ६ कोटी ९६ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे विधिवत पूजन करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेला पिंपळेसीम ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

     

    *यांची होती उपस्थिती*

     

    यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे, अडव्होकेट विनोद पाटील, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील, दुध संघाचे संचालक रोहित निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, गोविंदा मोरे, उपसरपंच अरुण पाटील, ग्रा.पं. सदस्य सोपान पाटील अमोल पाटील, अनिल पाटील, नारबा पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, मुलचंद पाटील, सुभाष पाटील, हुकूमचंद पाटील, मंगलअण्णा पाटील, चेअरमन व्हाईस चेअरमन, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, ज्ञानेश्वर पाटील, भगवानआबा पाटील, राजू पाटील, शाखा प्रमुख सुनील पाटील, शेतकी संघाचे संचालक गजानन पाटील, मुरलीधरअण्णा पाटील, चंदू शेठ भाटीया , प्रिया इंगळे, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, मंगलअण्णा पाटील, हुकूम मास्तर, तुकाराम पाटील, सुभाष अण्णा पाटील, मंगल भिका पाटील, हिरालाल पाटील, दगाअण्णा पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आयोजक एडवोकेट विनोद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला व भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करून गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक,ओपन जिम तसेच स्ट्रीट लाईटची मागणी केली. व बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच अरुण पाटील यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.