जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून तरुणावर करून महिन्यांपासून धारदार शस्त्राने वार अडीच महिन्यापासून फरार असलेल्या ललित उमाकांत दीक्षित याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पाळधीतील हॉटेलमध्ये येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सम्राट कॉलनीतील शुभम भगवान माळी यांच्यावर ललित दीक्षित याच्यासह दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ललित हा फरार होता. ललितवर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी तो पाळधी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. संशयित पाळधी येथील एका हॉटेलमध्ये येताच त्याला पोउनि, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने अटक केली.