जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील अनेक परिसरात १५ गंभीर गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (२२) व आमीर उर्फ गुड्डन शेख महंमद (२०) (दोघे रा. गेंदालाल मिल) या दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल आणि आमीर उर्फ गुड्न यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडेदोन्ही सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाचीउपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी चौकशी केल्यानंतर दोन्ही संशयितांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनील दामोदरे, बशीर तडवी, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, पोकों अमोल ठाकूर, पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे यांच्या पथकाने केली आहे.