Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पार्टनरने केला महिलेवर चाकूने वार : दोघे होते लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये !
    क्राईम

    पार्टनरने केला महिलेवर चाकूने वार : दोघे होते लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये !

    editor deskBy editor deskOctober 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक खून हे प्रेमप्रकरणातून पुढे येत असतांना अशीच एक धक्कादायक घटना कल्याण शहरात घडली आहे. लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कल्याणच्या पूर्व परिसरातील विजयनगर आमराई परिसरात घडली आहे.

    याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विजय जाधव याला अटक केली. हत्या करणयात आलेल्या महिलेचे नाव रसिका कोळंबेकर आहे. विजय रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून आज सकाळच्या सुमारास विजयने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

    विजय नगर आमराई परिसरात विजय जाधव व रसिका कोळंबेकर हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही महिन्यांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे या दोघांमध्ये वाद होत होते. आज सकाळच्या सुमारास विजय आणि रसिका मध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला. संतापलेल्या विजयने चाकूने रसिकावर हल्ला केला.
    या हल्ल्यात रसिका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विजय याला ताब्यात घेतले. रसिका हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    #police Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.