Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : चाळीसगावात तालुक्यात ग्रंथपालाला लाच घेताना अटक !
    क्राईम

    ब्रेकिंग : चाळीसगावात तालुक्यात ग्रंथपालाला लाच घेताना अटक !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 6, 2023Updated:October 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव तालुक्यातील आश्रमशाळेत केली कारवाई

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या ग्रंथपालाने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी असून तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी ऑनलाईन पवार यांनी 15 हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम 85 हजार 519 टक्केप्रमाणे 12 हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यामध्ये तडजोड होवून सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच सापळा रचून तो यशस्वी करण्यात आला.

    यांनी केली कारवाई
    जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख , पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हि कारवाई केली .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.