जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरातून किराणा दुकानाचे शटर उचकावून २२ हजार ४९० रूपयांचा मुद्देमालाची चोरी केल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी वासुदेव टिकूमल हनंदी (वय-५९) यांच्या मालीकीचे दुध फेडरेशन रोडवरील गेंदालाल मिल परिसरातील वासुदेव किराणा दुकान असून ते नेहमीप्रमाणे बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर कशानेतरी उचकावून आत प्रवेश करत २२ हजार ४९० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकारी दुसऱ्या दिवशी गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. त्यानुसार वासुदेव हनंदी यांनी चोरी झाल्याबाबत जळगाव शहर पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता वासुदेव हनंदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.