Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेत चोरले साडेपाच लाखांचे दागिने, भुसावळ पोलिसांनी सुरतला पकडले
    क्राईम

    रेल्वेत चोरले साडेपाच लाखांचे दागिने, भुसावळ पोलिसांनी सुरतला पकडले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सुरत ते रायपूर असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी बॅगेतून पाच लाख 63 हजार चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आला होता रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला चोवीस तासाच्या आत सुरत येथून मुद्दे माला सह अटक केली आहे.

    आमदाबाद पुरी एक्सप्रेस ने 21 रोजी सुरत वरून रायपूर येथे जाण्यासाठी गीताबेन योगेश पटेल वय 38 या प्रवास करीत होत्या त्या प्रवास करीत असताना 22 रोजी  जळगाव ते भुसावळ दरम्यान पहाटे ४.२० ते ४.४५ वाजेच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, २ चैन, एक रिंग, अंगठी, मोबाईल आणि रोख १ हजार असा ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल होता. चोरट्याने रेल्वेच्या बाथरूममध्ये बॅग घेऊन जात माल काढून घेतला.
    गीताबेन यांना जाग आल्यावर त्यांनी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरवीत भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक दिव्यांग व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. अधिक माहिती काढली असता तो ज्या रिक्षाने गेला त्या चालकाची माहिती पोलिसांनी काढली. पोलीसांनी माहिती मिळवल्यावर तो भुसावळात कन्हैया कुंज हॉटेलमध्ये थांबला असल्याचे समजले. तेथे त्याचे नाव साबीर लंगडा असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे व सुरतचा रहिवाशी असल्याचे समजताच त्याचा  शोध घेतल्यावर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.  पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेला ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    अवघ्या २४ तासात गुन्हा उघड करण्याची कामगिरी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय येरडे, राधाकृष्ण मीना, गुप्त वार्ता विभागाचे निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक संजय साळुंखे, हवालदार ठाकूर, घुले, खंदारे, आरपीएफचे भूषण पाटील, कैलास बोडके यांच्या पथकाने पार पाडली आहे. औरंगाबादच्या लोहमार्ग पोलीस विभागाच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या पथकाला या कामगिरीबद्दल ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.