• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महामार्गावर भीषण अपघात : १४ प्रवासी जखमी !

editor desk by editor desk
October 6, 2023
in क्राईम
0
महामार्गावर भीषण अपघात : १४ प्रवासी जखमी !

मलकापूर : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी धाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी मलकापूर आगाराची बस पहाटेच्या सुमारास आगारातून निघाली. या बसमधून १३ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस धाड रोडवरील मर्दडी घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत उलटली. सुदैवाने दरीत झाडांची संख्या अधिक असल्याने बस खोल दरीत कोसळली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना धाड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Tags: #accidentHighway
Previous Post

शेतातून परतणाऱ्या महिलेच चौघांनी केला विनयभंग !

Next Post

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली !

Next Post
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली !

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group