• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वहीच्या पानावर सुसाईट नोट लिहित १० वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास !

editor desk by editor desk
October 5, 2023
in क्राईम
0
वहीच्या पानावर सुसाईट नोट लिहित १० वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास !

जळगाव : प्रतिनिधी 

 

मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे अशी सुसाईड नोट लिहून तन्मय गजेंद्र पाटील (वय- १४, रा. गणेश कॉलनी) या दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील ए. टी. झांबरे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असेला तन्मय हा गणेश कॉलनीत वडील अॅड. गजेंद्र पाटील, आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्व जण झोपले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांनाच ओढणीच्या सहाय्याने छताच्या कडीला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. तन्मयचे वडीलांना जाग आल्यानंतर त्यांना तन्मय जागेवर दिसला नाही. त्यांनी मागे वळून बघितले असता त्यांना तन्मयने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर मुलाला लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. बुधवारी सकाळी तन्मयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी तन्मयचा मृतदेह बघून नातेवाईकांना देखील अश्रू अनावर झाले होते. तन्मयच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

वहिच्या पानावर लिहली सुसाईड नोट !

आत्महत्या करण्यापूर्वी तन्मयने आपल्या वहीच्या पानावर सूसाईट नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने मला अभ्यासाचा लोड झेपत नव्हता, तो लोड इतका होता की शेवटी मला मरुन जावे लागले” असे लिहीत तन्मयने आपले जीवन संपविले. पोलिसांनी ती सूसाईट नोट जप्त केली आहे.

Tags: #policestudentsuicide
Previous Post

खळबळजनक : घराला करंट देऊन परिवाराला संपविण्याचा प्लान फसला !

Next Post

काळ्या बाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला

Next Post
काळ्या बाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला

काळ्या बाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group