• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : घराला करंट देऊन परिवाराला संपविण्याचा प्लान फसला !

editor desk by editor desk
October 4, 2023
in क्राईम
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

सांगली : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक शहरात वाढती गुन्हेगारी आज देखील तशीच सुरु आहे. एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथून समोर आली आहे. घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार अशोकराव शंकरराव निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात केली. निकम यांनी अज्ञातांविरोधात ही तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यशाहिर (कै.) शंकरराव निकम यांचे मोठे सुपूत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत. मध्यरात्री बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटूंबीय झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. निकम यांच्या घराजवळ असणाऱ्या हेवी टेन्शनच्या ट्रांसफार्मर मधून तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या कोयंड्याना जोडण्यात आल्या. नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून या जोडलेल्या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची अशा हेतूने हल्लेखोरांनी त्याची जोडणी केली होती.

रात्री दीडच्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जवळ स्फोट होऊन जाळ लागला. मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे जागे झालेल्या निकम कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. या स्फोटामुळे ट्रीप होऊन वीज गेल्याने सुदैवाने घराबाहेर पडताना कडी-कोयंड्याना हात लागूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. सावध झालेल्या निकम कुटुंबीयांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा डाव आहे हे जाणून तातडीने बचावाच्या हालचाली केल्या. या दरम्यान काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र हे हल्लेखोर कोण होते त्याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही.

Tags: #policeCrimesangali
Previous Post

‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर तरुणीची सही घेत अत्याचार !

Next Post

वहीच्या पानावर सुसाईट नोट लिहित १० वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास !

Next Post
वहीच्या पानावर सुसाईट नोट लिहित १० वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास !

वहीच्या पानावर सुसाईट नोट लिहित १० वीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group