Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित दादांची नाराजी दूर : १२ जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री !
    राजकारण

    अजित दादांची नाराजी दूर : १२ जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री !

    editor deskBy editor deskOctober 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याचं दिसत होतं. आज शिंदे-फडणवीस सरकारनं त्यांची ही नाराजी दूर केलीय.परंतु त्याचवेळी अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारवर नाराज होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर न जाणं या गोष्टींतून अजित पवारांची नाराजी सहज दिसून येत होती. अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केलीय. ही यादी पाहून सरकारमध्ये अजित पवार गटाचं दबाव वाढत असल्याचं दिसतं आहे. अजित पवार गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे.

    राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्री कोण? पहा यादी

    पुणे- अजित पवार

    अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

    सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

    अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

    भंडारा- विजयकुमार गावित

    बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

    कोल्हापूर- हसन मुश्रीफ

    गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

    बीड- धनंजय मुंडे

    परभणी- संजय बनसोडे

    नंदूरबार- अनिल भा. पाटील

    वर्धा – सुधीर मुनगंटीवार

    सत्तेत सामील झाल्यापासून पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं, यासाठी अजित पवार आग्रही होते. त्यांचा हाच आग्रह त्यांच्या नाराजीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या ७ दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा, असा अल्टिमेटम अजित पवार गटाने महायुतीला दिला होता. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवलं.

    अजित पवार यांची नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास पालकमंत्रीपदाचा तिढा या विषयावर चर्चा झाली.

    Ajit pawar palakmantri pad rashtrvadi congress
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !

    October 29, 2025

    साईभक्तांच्या फॉर्च्युनरचा भीषण अपघात : तीन ठार, चार गंभीर जखमी

    October 29, 2025

    आता माघार नाहीच : बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम !

    October 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.