जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरापासून नजीक असलेल्या भादली बुद्रुक येथे राहत्या घरात विष प्राशन केलेल्या चुडामण रमेश नारखेडे (वय ३९) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे चुडामण नारखेडे हे वास्तव्यास असून त्यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.