हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील शासकीय शालेय विध्यार्थींना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यानुसार आता बांधकाम मजुरांना देखील माध्यान्ह भोजन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. परंतु या माध्यान्ह भोजनाबाबत तक्रार येणे सुरूच आहे. निकृष्ट दर्जाचे हे भोजन असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यात आता भोजनात किडे आढळून आल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हि घटना हिंगोलीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या कामगार विभागा मार्फत बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात विषारी किडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत उघडकीस आला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जवळा पळशी गावात तुरीच्या डाळीमध्ये नाकतोडा नावाचा किडा आढळला असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. सदर प्रकारानंतर या गावकऱ्यांनी माध्यान्ह भोजन योजनेच्या कंत्राटदाराकडून वाटप करण्यात आलेले जेवण परत करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या आधी देखील माध्यान्ह भोजन योजनेच्या कंत्राटदाराकडून उत्कृष्ट दर्जाचे जेवण पुरवठा होत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भोजन व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावत जाब विचारला होता. यानंतर पुन्हा भोजनात कीड आढळून आला आहे.