- मनमाड : आप्पा बिदरी
राज्यातील गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठय प्रमाणात अडवणूक होत असल्याने नाशिक जिल्ह्यात या कोंडीप्रकरणी मनमाड बाजार समितीमध्ये सभापती व संचालक मंडळाने व्यापाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेऊन उद्यापासून कांदा लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बैठक तोडग्याविनाच पार पडली. व्यापऱ्यांनी तातडीने लिलावात सहभागी होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक थांबविण्याचे आवाहन सभापती संजय पवार यांनी केले. उद्यापासून लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱयांवर बाजार समिती प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशाराही पवार यांनी दिला तर शासन संपाबाबत सकारात्मक नसल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला.पिंपळगाव बसंवत होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठक होणार आहे. त्यात काय निर्णय होतो.याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.