अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे काही कारणास्तव पोलिसांकडून वाहन जप्त करण्यात आलेली असतात. अशाच प्रकारे जप्त केलेली खासगी बस पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली होती. या बसमध्ये एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तोसिफ इनामदार (वय ३४) असे मयताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.