• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीचा बलात्कार

editor desk by editor desk
October 2, 2023
in क्राईम
0
पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीचा बलात्कार

पुणे : वृत्तसंस्था

 

पुणे शहरातील विमान नगर परिसरातील कॅफे मध्ये पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28 सप्टेंबर) रात्री घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी दत्तात्रय देविदास खरात (वय-27 रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे), मदन नरसींग राठोड (वय-31 रा. माथे आळी, लोहगाव, पुणे) आणि बॅकयार्ड कॅफे चा मॅनेजर यांच्यावर आयपीसी 376, 376 (अ), 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत 32 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दत्तात्रय खरात आणि मदन राठोड यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमध्ये ‘बॅकयार्ड’ नावाचा कॅफे आहे. पीडित तरुणी ही तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत बॅकयार्ड कॅफे हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेली होती. कॅफेमध्ये पार्टी केल्यानंतर बिल देण्यासाठी पीडित तरुणीने डेबिट कार्ड दिले. मात्र, डेबिट कार्डचा पिन नंबर आठवत नसल्याने कॅफेचे बिल देता आले नाही. त्यामुळे कॅफे मॅनेजर व स्टाफने पीडित तरुणाला शिवीगाळ करुन हाताना मारहाण केली. तसेच तिच्याकडील तीन डेबीट कार्ड, हेडफोन, पॅनकार्ड, आधार कार्ड काढून घेऊन बिल दिल्यानंतर वस्तू परत देतो असे सांगून हॉटेलच्या बाहेर काढले.

त्यानंतर तरुणी कॅफेत थांबली होती. त्यावेळी कॅफेमधील एका ग्राहकाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करून खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी दिली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपी दत्तात्रय खरात याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Tags: #police#pune#rapeCrime
Previous Post

प्रेयसी सोबत फिरतो म्हणून राग ; मित्राचीच केली हत्या !

Next Post

पोलीस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये घेतला गळफास !

Next Post
पोलीस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये घेतला गळफास !

पोलीस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group