चोपडा प्रतिनिधी: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील आदरणीय डॉ. शैलेश वाघ यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाला पूरक केक फ्री ग्रीन कॅम्पस या उपक्रमाला दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला दोन वर्ष पूर्ण झालेले असून (21 Nov. 2019 To 21 Nov. 2021) महाविद्यालयातील सर्व बंधू-भगिनींनी सदर उपक्रमास स्वयंम प्रेरणेने सहभाग नोंदविला यामध्ये महाविद्यालयातील कर्मचारीवृंद आपल्या वाढदिवसाला केक न कापता वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सर्व कर्मचारीवृंद यांनी घेतला. यामुळे पर्यावरण विषयक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे व हाच संकल्प आजही सर्व कर्मचारी वृंद स्वयंप्रेरणेने कार्यान्वित होताना दिसत आहे. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालय परिसरात आंबा, निंब, वड,अशा विविध ७० वृक्षांची लागवड करण्यात आली व शिक्षकांचा आदर्श घेऊन विद्यार्थी देखील अशा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत आहे.
सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. आर. आर. पाटील व प्रा. मुकेश भाईदास पाटील हे काम बघत आहे. तसेच वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करणाऱ्याला ए. बी. सूर्यवंशी सर हिंदी विभाग प्रमुख यांच्या वतीने वाचन प्रेरणा उपक्रम अंतर्गत पुस्तक भेट दिले जातात.