• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाला उसने पैश्याचा वाद भोवला : संशयित आरोपी ताब्यात !

editor desk by editor desk
October 2, 2023
in क्राईम, भुसावळ
0
तरुणाला उसने पैश्याचा वाद भोवला : संशयित आरोपी ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास जिम ट्रेनर नाजिश नासिर शेख याच्यावर उसने पैसे परत मांगितल्याच्या कारणामुळे महिलेसह इतर दोघांनी तलवार व चाकूचे वार करून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजिश शेख याने सुलतानाबी मुबारक खान हिस उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रविवारी सकाळी सुलतानाबी मुबारक खान (३५, रा. स्वामी विवेकानंद शाळेजवळ केशवनगर, भुसावळ), इजहार उर्फ ईज्जू जलालुद्दीन शेख (२३, रा. आझादनगर, भुसावळ), आसिफ शेख (२१, रा. आझादनगर भुसावळ) यांनी तलवारीने व चाकूने वार करून नासीर यास ठार मारले. भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात नाजीर हा पत्नी, मुलगा, मुलीसह वास्तव्यास होता. माहीर फिटनेस सेंटर चालवून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तत्काळ जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मयताची आई शर्मिला शेख नासिर यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी महिला वगळता इतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिनाभरापूर्वीच भुसावळ काही लागोपाठच्या खूनांच्या घटनांनी हादरले होते.

Tags: #policeBhusawalCrimeMan arrest
Previous Post

कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट 

Next Post

२० फुट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Next Post
२० फुट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

२० फुट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group