मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबईत हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हाफिज सईद मोठा झटका बसला आहे. त्याचा अत्यंत जवळचा साथीदारही यमसदनी गेला आहे. सईदचा अत्यंत खास असलेल्या मुफ्ती कैसर फारुखी याची हत्या करण्यात आली आहे. काही लोकांनी मुफ्ती कैसरवर गोळीबार केला. दिवसाढवळ्याच मुफ्ती कैसर याचा गेम करण्यात आल्याने हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानसाठीही ही हादरवणारी घटना आहे. तर मुफ्ती कैसरच्या रुपाने भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे.
मुफ्ती कैसर फारख हा भारत विरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा सह संस्थापक होता. तो लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिस सईद यांचा निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या कराची शहरात अज्ञात व्यक्तीने त्याची गोळ्या घालून हत्या केली. मुफ्ती कैसर हा रस्त्यावरून पायी जात होता. तेवढ्यात समोरून काही लोक आले आणि त्यांनी मुफ्ती कैसरवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्यात तो जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर, हल्लेखोरांनी मुफ्ती कैसरचा गेम केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मुफ्ती कैसरवर कुणी हल्ला केला? त्याची हत्या का करण्यात आली? याची काहीच माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणत्याही दहशतवादी संघटनेने किंवा कोणत्याही ग्रुपने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मुफ्ती कैसरला ठार करण्यामागे अज्ञात लोकांचा हेतू काय होता? याचा तपास करण्यात येत आहे. मुफ्ती कैसर यांच्या मृत्यूमुळे हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. हाफिज सईदच्या अनेक कारवायात मुफ्ती कैसरचा सहभाग होता. आधी मुलगा आणि आता जवळचा साथीदार गेल्याने हाफिज सईद कोलमडून गेल्याचंही सांगण्यात येत आहे.
मुफ्ती कैसर फारुखच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमधून सर्व काही स्पष्ट होताना दिसत आहे. मुफ्ती कैसर रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहे. त्याने अंगात सफेद कुर्ता आणि पायजमा घातलेला आहे. एका ठिकाणी तो थांबतो. त्यानंतर पाठीमागून एक काही बाईक स्वार येतात आणि त्याच्यावर गोळ्या घालून निघून जातात. यावेळी मुफ्ती कैसर स्वत:चा बचाव करतानाही दिसत आहे. मात्र, एक गोळी लागल्यानंतर तो खाली कोसळल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.