• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विहिरीत उडी घेत तरुणाने संपविली जीवनयात्रा 

editor desk by editor desk
October 1, 2023
in क्राईम
0
विहिरीत उडी घेत तरुणाने संपविली जीवनयात्रा 

जळगाव : प्रतिनिधी

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरातील सुभाषवाडी येथील २२ वर्षीय तरुणाने विहरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. पवन भिका जाधव असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील सुभाषवाडीमध्ये पवन जाधव हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी तो कुटुंबियांना मी बाहेर जातो असे सांगून घरातून निघाला. त्यानंतर त्याचा भाऊ आणि वडील हे कामावर निघून गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी पवन हा घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी संपुर्ण गावात आणि नातेवाईकांकडे पवनचा शोध घेतला. मात्र तरी देखील तो मिळून न येत असल्याने त्यांनी गावातील शेतांमध्ये पवनच्या शोध घेण्यासाठी निघाले.

गावाजवळ असलेल्या दिनेश चव्हाण यांच्या शेतातील विहरीजवळ पवनच्या अंगातील शर्ट, बुट आणि तंबाखूची पुडी पडलेली दिसून आली. दरम्यान, पवनच्या कुटुंबियांनी विहरीत डोकावून पाहिले असता, त्यांना पवनचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी लागलीच पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावून पवनचा मृतदेह बाहेर काढला. पवनच्या पश्चात आई, वडील, भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अतुल पाटील, शाबाद सैय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी पवनची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #policeCrimesuicide
Previous Post

शिक्षिका शिकवत असतांना मुलीसोबत जे झाले ते धक्कादायक !

Next Post

नशिराबाद पोलिसांची कारवाई : विनापरवाना सुरु होती म्हशी वाहतूक !

Next Post
नशिराबाद पोलिसांची कारवाई : विनापरवाना सुरु होती म्हशी वाहतूक !

नशिराबाद पोलिसांची कारवाई : विनापरवाना सुरु होती म्हशी वाहतूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group