सुरत : वृत्तसंस्था
प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कधी व कसा येणार हे कुणीही सांगू शकत नाही अगदी चालता- बोलता, हसता- खेळता मृत्यू आल्याचे अनेक प्रसंग आजपर्यंत ऐकले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आठवीतील मुलीचा वर्गातच ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सुरतमधील गोडादरा इथल्या शाळेत १२ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका आला. वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच मुलीला अस्वस्थ वाटू लागते. आणि काही क्षणात ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. अचानक घडलेल्या या घटनेने वर्गातील शिक्षिकेसह मुलेही घाबरुन गेली. शिक्षिकेने मुलीला लगेच उठवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी काहीच हालचाल करत नसल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बच्चों को हार्ट अटैक का खतरा… गुजरात के सूरत में क्लास में बैठी एक 12 साल की बच्ची को दिल का दौरा पड़ गया।
स्कूल की टीचर और स्टाफ के लोग उसे अस्पताल लेकर पहुंचे, जहां उसकी मौत हो गई#HeartAttack #HeartSignal6 #Death #gujrat #Surat #heartattackdeath pic.twitter.com/kqQD9DscRn
— Journalist Simran Singh (@singhsimran4321) September 28, 2023
व्हिडिओमध्ये वर्गात शिक्षिका शिकवत असल्याचे दिसत आहे. अचानक पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलीला अस्वस्थ वाटू लागते. बघता- बघता ती खाली कोसळते, ज्यामुळे सगळेच घाबरुन जातात. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आल्याने मुलीच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.