जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील रामानंद नगर पोस्टे हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन संशयित आरोपींना एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे व मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोस्टे हद्दीतील सचिन अभयसिंग चव्हाण रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा जळगाव, नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा जळगांव, व राहुल नवल काकडे रा. समता नगर यांना स्थानबध्द करण्यात आले आहे. या तिघाही तरुणावर रामानंद नगर पोस्टे हद्दीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी करीत असताना गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या करीता तिन्ही धोकादायक इसमांवर कायद्याचा वचक राहावा व भीती राहावी तसेच त्यांच्या हातुन समान्य लोकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता पोलीस निरीक्षक श्रीमती. शिल्पा पाटील यांनी सदर इसमांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभुमी काढुन पोलीस अधिक्षक श्री. एन. राजकुमार. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. चंद्रकांत गवळी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी हि केली आहे.
हि कार्यवाही करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) पो.ना. राजेश चव्हाण, पो.हे.कॉ. विजय खैरे, पोना/हेमंत कळसकर पो.ना.रेवानंद साळुंखे, पोना / विनोद सुर्यवंशी पो. कॉ.रवींद्र चौधरी, पो.कॉ.जुलालसिंग परदेशी, पोकॉ.इरफान मलिक व स्थानिक गुन्हे शाखा पो. कॉ. ईश्वर पाटील या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्तींच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन तिघांना स्थानबद्ध करणे बाबत महत्वाची भुमिका पार पाडली आहे.