Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूच्या डंपरने घेतला परिचारिकेचा जीव
    क्राईम

    वाळूच्या डंपरने घेतला परिचारिकेचा जीव

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भरधाव वाळू डंपरच्या धडकेत जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जळगाव –भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात नित्याचेच झाले आहे.

    अपघात जळगाव–भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानजीक दुपारी  वाळू डंपर क्रमांक एमएच.१९.वाय.७७७३ ने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेरणा देविदास तायडे वय-३२ रा.कंडारी, ता.भुसावळ हिचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिच्या स्कुटीचा चुराडा झाला आहे.

    घटनेची माहिती कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहाय्यक फौजदार अलीयार खान, कर्मचारी हसरत सैय्यद, महिला कर्मचारी लिना लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    अपघात इतका भयंकर होता कि दुचाकी डंपरच्या खाली दाबली जाऊन महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. मयत प्रेरणा तायडे या जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका असून कामावरून सुट्टी झाल्याने त्या घरी जात होत्या. नशिराबाद पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मयताच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.