• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव ट्रक रिक्षावर उलटली ; चार जणांचा दुर्दैवी मृत्यू ! 

editor desk by editor desk
September 28, 2023
in क्राईम
0
भरधाव ट्रक रिक्षावर उलटली ; चार जणांचा दुर्दैवी मृत्यू ! 

चंद्रपूर : वृत्तसंस्था

 

राज्यातील अनेक महामार्गावरून अपघाताची मालिका सुरु असतांना चंद्रपूर जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातामध्ये रिक्षाचालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रक ऑटोरिक्षावर उलटली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात येत होता. अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर उलटला. ट्रकखाली चिरडल्याने ऑटोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजकला मोहूर्ले, गीता शेंडे, दशरथ बोबडे अशी जखमींची नावे आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Tags: #accidentChandrapur
Previous Post

दारूच्या नशेत केला अल्पवयीन मुलीचा खून !

Next Post

बलात्कारानंतर ती अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत… 

Next Post
बलात्कारानंतर ती अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत… 

बलात्कारानंतर ती अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत... 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group