अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंधरा वर्षीय मुलीचा खून करून मृतदेह नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटात फेकून दिल्याचे रविवारी समोर आले होते. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. १९ सप्टेंबरला त्याने दारूच्या नशेत मुलीचा खून केला होता, तसेच त्याने त्याच्या आईचाही खून केल्याचे सांगितले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
पोलिसांनी खून प्रकरणात तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत तुषार विठ्ठल वाळुंज याचे नाव समोर आले. त्याला घरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याची कबुली दिली. तो मुलीला घेऊन फिरण्यासाठी डोंगर परिसरात गेला होता. तेथेच त्याने जुन्या चंदनापुरी घाटात दारूच्या नशेत तिचा खून केला. ती मयत झाली अथवा नाही, हे पाहण्यासाठी तो दोन दिवसांनी तेथे गेला होता