नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एक नकार देणं एक तरूणाला भलंतच महागात पडलं. कारण त्याच्या नकारानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. वाचून धक्का बसला ना ? पण तिने असं का केलं, हे वाचलंत तर आणखीनच मोठा धक्का बसेल. त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला एवढ्यासाठीच केला कारण त्याने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ते देखील तिच्याशी नव्हे तर तिच्या मैत्रिणीशी…. सगळं वाचूनच गरगरायला लागलं असेल ना ?
कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तेथील चौबेपुर गावाता राहणाऱ्या एका तरूणाचे त्याच गावातील एका विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध होते. आपल्या मैत्रिणीची ओळख करून देण्याच्या निमित्ताने त्या (विवाहीत) महिलेने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले. त्या मैत्रीणीने त्याच्यासोबत लगट करण्यास सुरूवात केली. तिला त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवायची इच्छा होती, ती त्याला तशी जबरदस्ती देखील करू लागली. मात्र त्या तरूणाला हे बिलकूल आवडले नाही आणि त्याने शारिरीक संबंध ठेवण्यास थेट नकार दिला. मात्र हे ऐकून त्या महिलेला त्याचा प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरातच तिने त्याच्यावर वार करत त्याच प्रायव्हेट पार्टच कापला. वातावरणात एकच किंकाळी घुमली. त्या तरूणाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणाने तेथून लगेच पळ काढला आणि तो कसाबसा अडखळत, चालत घरी पोहोचला. त्याची ही अवस्था पाहून घरातले सगळे लोक हादरलेच. मात्र त्यांनी वेळ न दवडता, त्याला लगेचच कानपूरमधील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले.