• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जावयाने केली पत्नीची तक्रार ; सासरच्यानी लई धुतला !

editor desk by editor desk
September 27, 2023
in राष्ट्रीय
0
जावयाने केली पत्नीची तक्रार ; सासरच्यानी लई धुतला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथून समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याबाबत तक्रार करण्यासाठी तो त्याच्या सासरी गेला. पण हे काम करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. पालकांनी महिलेची बाजू घेत तरुणाला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता या तरुणाने एसपी कार्यालय गाठून न्यायाची मागणी केली आहे.

झाशी जिल्ह्यातील कोतवाली भागातील लक्ष्मी गेट येथे ही घटना घडली आहे. येथील रहिवासी महेंद्र कुशवाह याने आपल्या कुटुंबासह जखमी अवस्थेत पोलिसात धाव घेतली. महेंद्रने सांगितलं की, तो महापालिकेत माळी म्हणून काम करतो. त्याला दोन मुलं आहेत. तो सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो आणि 5 वाजता घरी परततो. 1 फेब्रुवारी 2016 रोजी काजल नावाच्या महिलेशी त्याचा विवाह झाला होता.

दररोज प्रमाणे 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी तो ड्युटीवरून घरी आला असता पत्नी काजल फोनवर बोलत असल्याचे दिसलं. त्याने पत्नीला विचारलं असता ती काहीच बोलली नाही. उलट तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. काजलने तिच्या कुटुंबाला बोलावलं. महेंद्रने याबाबत पालकांकडे तक्रार केली असता ते संतापले. तुम्ही मुलीचा छळ करत आहात, खोटे आरोप करत आहात, असं म्हटलं.

महेंद्रला यानंतर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात महेंद्रच्या डोक्याला दुखापत झाली. तो जखमी झाला. बहीण त्याला वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीची ही घटना तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्रने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केली, मात्र मदत न मिळाल्याने त्यांनी एसपी कार्यालय गाठून न्यायाची मागणी केली. याप्रकरणी नगरचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, कोतवाली परिसरात झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती घेतली असता पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. पत्नीच्या कुटुंबीयांनी मिळून मुलाला बेदम मारहाण केली होती. तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags: marhanpolice social mediaUttrapradesh
Previous Post

शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण उत्साहात !

Next Post

नकार देताच गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला !

Next Post
नकार देताच गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला !

नकार देताच गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group