लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: प्रवासी बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात दोन आरटीओ एजट यांनी 10 हजाराची लाच घेताना एसीबीने ररंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतली आहे ती बस तक्रारदार याच्या वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या आरटीओ कार्यालयात आले असता बस हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरोपी शुभम राजेंद्र चौधरी,वय-२३, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव ,राम भिमराव पाटील, वय -३७, व्यवसाय आरटीओ एजंट जळगाव यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने 10 हजार रुपयांची मागणी केली. एसीबीचे डी वाय एस पी शशिकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक .संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ. यांनी आरटीओ कार्यालयात सापळा लावला असता ती रक्कम स्वीकारताना स्वतःआरोपी शुभम राजेंद्र चौधरी आरटीओ कार्यालय जळगावच्या आवारात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.