• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हल्लेखोरांनी तलवारी नाचवत दुकानदाराकडून घेतली खंडणी !

editor desk by editor desk
September 26, 2023
in क्राईम
0
हल्लेखोरांनी तलवारी नाचवत दुकानदाराकडून घेतली खंडणी !

पुणे : वृत्तसंस्था

 

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना फलटण शहरातून समोर आली आहे. फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना घडली असून हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला.

यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; परंतु खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी झाला. रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली.

अरिंजय दोशी (वय ७२) असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेजारील काही दुकानांतही कोयता आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणीची मागणी करण्यात आली तर बारामती चौकामधील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर हल्लेखोरांनी खंडणीसाठी जोरदार दगडफेक केली. तर बारामती चौकामधील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर हल्लेखोरांनी खंडणीसाठी जोरदार दगडफेक केली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, शहरातील रविवार पेठेतील उघड्या मारुती मंदिर परिसरात जुनी बाजारपेठ आहे. या परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते. आज रविवार बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील लोकांचीही या परिसरात दिवसभर मोठी गर्दी होती. या बाजारपेठेत हुतात्मा स्मारकासमोर सुहास रेडिमेड व मॅचिंग सेंटर नावाचे दुकान आहे. सायंकाळी पावणेसहा ते सहाच्या सुमारास दोन हल्लेखोर दुकानात घुसले.

त्यापूर्वी एकाने शेजारील दुकानातील रुमाल हिसकावून तोंडाला बांधला होता, तर दुसऱ्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. एकाच्या हातामध्ये तलवार तर दुसऱ्याच्या हातात कोयता होता. दोघांनी हातातील हत्यारांचा धाक दाखवून अरिंजय दोशी यांच्याकडे दरमहा खंडणीची मागणी करीत गल्ला उघडून त्यातील रक्कम काढून घेतली. यावेळी मालक अरिंजय दोशी यांनी त्यांना अटकाव करताच त्यातील एकाने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करताच श्री. दोशी यांनी तो हुकविला.

त्यामुळे तो कोयत्याचा वार खांद्याला घासून गेल्याने श्री. दोशी जखमी झाले. यावेळी याच दुकानातील दुसरा गल्ला हल्लेखोरांना उघडता न आल्याने ते गल्लाच उचलून बाहेर घेऊन गेले. काही अंतरावरील एका दुकानासमोर गल्ल्यातील नोटा घेत त्यातील चिल्लर व गल्ला तेथेच टाकून दिला. पडलेली चिल्लर एका अल्पवयीन मुलीने दोशी यांना आणून दिल्याने हल्लेखोरांनी मुलीसही दमदाटी केली. यानंतर हल्लेखोरांनी शेजारील दुकानांकडे मोर्चा वळवत तेथे खंडणीची मागणी केली.

दरम्यान, या घटनेपूर्वी हल्लेखोरांनी बारामती चौकामधील हिमालय जनरल स्टोअर्स या दुकानाच्या मालकाकडे खंडणीची मागणी करून दुकानावर जोरदार दगडफेक केली. त्याचबरोबर अन्य काही दुकानदारांनाही खंडणीची मागणी करीत शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Tags: #puneCrimejalgaonpolice
Previous Post

पोलीस हैराण : चारचाकीत मिळाले इतक मोठ घबाड !

Next Post

तरुणीला मद्य पाजून डॉक्टराने केला बलात्कार !

Next Post
तरुणीला मद्य पाजून डॉक्टराने केला बलात्कार !

तरुणीला मद्य पाजून डॉक्टराने केला बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group