लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महा विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मतदानापूर्वी मिळाले होते त्यामुळे सुज्ञ मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि तसेही महा विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी होती असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र लाईव्ह बोलताना व्यक्त केले.
महाविकास आघाडीला अकरा जागा बिनविरोध झाल्याने आधीच स्पष्ट बहुमत मिळाले होते त्यात भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्याने फक्त निवडणुकीची औपचारिकता उरली होती मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि समोर नगण्य असे उमेदवार होते
महा विकास आघाडीने संपूर्ण जागा जिंकलेले आहे महा विकास आघाडीच्या सभासदांकडून शेतकऱ्यांची हीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळेस बँकेने मदत केली पहिले आणि ती मदत करण्यासाठी महा विकास आघाडीचे सर्व नेते कटिबद्ध राहतील असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
येत्या काळात जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी कोणताही किडा महाविकास आघाडीत नाही यापूर्वी टप्प्याटप्प्याने सर्वांना हे पद देण्याचे ठरलेले आहे ज्यावेळेस अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक लागेल त्यावेळेस बैठक घेऊन जो निर्णय होईल तो महा विकास आघाडीच्या नेत्यांना मान्य राहील असे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.