नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एका चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश करून पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. चोरट्याचं हे कृत्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठच्या विहार कॉलनीतील आहे, जिथे खाटू श्याम मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेली. चोर सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात आला हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने आपल्या गुन्ह्यांबद्दल देवाकडे क्षमा मागितली. यानंतर मंदिरातून देवाची मूर्ती चोरीला गेली. राधा अष्टमीच्या आदल्या दिवशी मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस मूर्ती आणि चोराचा शोध घेत आहेत. मूर्ती जप्त करण्याबाबत महिलांनी पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला, मात्र सीसीटीव्ही फुटेज असूनही अद्याप चोरट्याचा शोध लागलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.