• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून ट्रकचालकाला मारहाण ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 23, 2021
in क्राईम, जळगाव
0
आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून ट्रकचालकाला मारहाण ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील अग्रवाल चौकात महामार्गावर ट्रक थांबवून ट्रक ओव्हरलोड असल्याचे सांगितले ट्रक चालकाने वजनकाटा केला असून ट्रक ओव्हरलोड नसल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला असता, आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्‍यासह कर्मचारी अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्तीसगढ राज्यातील रहिवासी चालक विनोद मुकूंदलाल चौरे वय ३७ हे त्यांच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रक घेवून जळगावहून जात होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. ०४ के.आर. ६४१९ या शासकीय वाहनातून आलेल्या आरटीओ विभागाच्या अधिकार्‍यांसह दोन कर्मचारी अशा तिघांनी चौरे यांचा ट्रक महामार्गावर जळगाव शहरात अग्रवाल चौकात ऍक्सेस ब्रेन हॉस्पिटलच्या समोर अडविला. तसेच गाडी ओव्हरलोड असल्याचे सांगत तुला दंड भरावा लागेल, असे ट्रकचालक यांना अधिकार्‍यांनी सांगितले.

गाडीचा वजनकाटा केला असून गाडी ओव्हरलोड नसल्याचे ट्रकचालक चौरे यांनी संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांना सांगितले व दंड भरण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी चौरे यांच्या कानशिलात लगावली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण मारहाण केली. या मारहाणीत चालक चौरे यांच्या पायाचे हाड मोडले असून दुखापत झाली आहे. जखमी चालक विनोद चौरे यांनी दिलेल्या जबाबावरुन सोमवार, २२ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी एम.एच. ०४ के.आर. ६४१९ या आरटीओ विभागाच्या वाहनावरील अधिकारी तसेच कर्मचारी (नाव गाव माहित नाही) अशा तीन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.

Previous Post

जळगावात वाळूच्या ट्रॅक्टरची रिक्षाला धडक ; रिक्षाचालकाचे प्राण वाचले

Next Post

मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे जेरबंद

Next Post
मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे जेरबंद

मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांनी आज आर्थिक व्यवहारात अधिक काळजी घ्या !

June 15, 2025
आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
राजकारण

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 14, 2025
खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !
कृषी

खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !

June 14, 2025
मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group