• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोटच्या मुलीचा बापाने गळा आवळून केला खून !

editor desk by editor desk
September 25, 2023
in क्राईम
0
पोटच्या मुलीचा बापाने गळा आवळून केला खून !

डोंबिवली : वृत्तसंस्था

 

डोंबिवली पूर्वेतील माणगाव स्मशानभूमीच्या मागे हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकारामुळे माणगाव चाळीतील लोकही हादरून गेले आहेत. मनोज कुमार रामप्रसाद आग्रहारी (वय 38) याने त्याच्या गतिमंद मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजने पोटच्या मुलीचीच हत्या केल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मनोज हा माणगाव चाळीच्या मागील एकाच चाळीत पत्नी लीलावती आणि 10 वर्षाची मुलगी लवली यांच्यासोबत राहतो. मनोज हा किराणा दुकानात काम करून कुटुंबाचं गुजराण करतो. त्याची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद आहे. तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते. लवलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले. पण कोणताच फायदा होत नव्हता. दवाखान्यातील खर्चामुळे मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा. मनोज कधी कधी प्रचंड संतापून जायचा. लवलीचा काही उपयोग नाही. तिला संपवून टाकू, अशी संतप्त विधाने मनोज करायचा, असं सूत्रांनी सांगितलं.

वडिलांच्या संतप्त स्वभावामुळे लवलीही बिथरलेली होती. ती सतत आईसोबत राहायची. आईला एकक्षणही सोडत नव्हती. लिलावतीही लवलीची प्रचंड काळजी घेत होती. पण 24 सप्टेंबर रोजी म्हणजे काल संध्याकाळी 5 च्या सुमारास काही कामानिमित्ताने लिलावती बाहेर गेली होती. त्यावेळी मनोज घरी आला. तेव्हा त्याने लवलीला घरात एकटे पाहिले अन् लवलीची गळा दाबून हत्या करून पसार झाला. लवलीची आई जेव्हा घरी आली तेव्हा तिने मुलीला निपचित पडलेलं पाहिलं. त्यानंतर तिने आरडाओरडा केली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी लिलावती हिने मनोजच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे डोंबिवलीकर चांगलेच हादरून गेले आहेत.

Tags: #policeCrimemurder
Previous Post

अंत्ययात्रेत मधमाशांचा अचानक हल्ला ; २०० नागरिक जखमी !

Next Post

मामीने दिली भाच्याला साथ अन काढला मामाचा काटा !

Next Post
मामीने दिली भाच्याला साथ अन काढला मामाचा काटा !

मामीने दिली भाच्याला साथ अन काढला मामाचा काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group