Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमाचं नातं तुटलं : तरुणाने प्रेयसीच्या आईसह भावाला पेटविले अन..
    क्राईम

    प्रेमाचं नातं तुटलं : तरुणाने प्रेयसीच्या आईसह भावाला पेटविले अन..

    editor deskBy editor deskSeptember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या गुन्हेगारीला आता अमरावती शहर देखील मोठ्या चर्चेत आले आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आहे. त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केलीये. या धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

    गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. वाद वाढत गेला आणि प्रेमाचं नातं तुटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचे भांडणही झाले.

    याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं. आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन या तरुणाने पुढे स्वत:लाही संपवून घेतलं. वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवारी रात्री १ च्या दरम्यान आई आणि मुलाची जाळून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने देखील स्वतः तेथेच जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मृतक लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) अशी जाळून हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आरोपी आषिश ठाकरे (वय 25 वर्ष) असे स्वत: जाळून घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.

    #police Crime murder
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मी कुणावरही जबरदस्ती केली नाही ; अशोक खरातचा खुलासा !

    March 27, 2026

    वनविभागाचा छापा; ७,५०० किलो डिंकसह आरोपी पकडले

    March 27, 2026

    चाळीसगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.