लातूर : वृत्तसंस्था
लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कोठडीसमोर पहारा देत असताना शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून घेतली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून गंभीर जखमी पोलिसास खासगी रुग्णालयात दाखल आहे.
पोलिस कर्मचारी पांडुरंग शंकरराव पिटले (वय ५०, रा. मंठाळेनगर, लातूर) हे लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पांडुरंग पिटले हे शुक्रवारी रात्री कर्तव्यावर होते. दरम्यान, अचानकपणे १०:१५ वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी सुटण्याचा आवाज आल्याने ठाण्यात असलेल्या इतर पोलिसांनी कोठडीकडे धाव घेतली. त्यावेळी पिटले हे गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.


