मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक परिवारातील नवरा व बायको मध्ये सुरु असलेले वाद हे कधीच मिटत नसतात तर हे वाद अनेकदा हसून मागे पडत असतात तर काही बायका याच वादातून नवऱ्याला नेहमीच धमकावत असतात. अशाच एका नवविवाहितेने नवऱ्याला भीती दाखवन्याच्या उद्देशाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. हि घटना जिंतूर तालुक्यातील कावी येथे घडली आहे. बामणी पोलिसांनी दाेन्ही कुटुंबियांच्या माहितीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली (वय 19 वर्षे) हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने राहात होते. ते महालक्ष्मी सणासाठी गावाकडे आले होते. 21 सप्टेंबरला सायंकाळी महालक्ष्मी मांडणे झाल्यानंतर सायलीला लक्ष्मण यांनी गणपतीकडे जातो असे म्हटले तेव्हा तुम्ही गणपतीकडे जाऊ नका मी फाशी घेईल असे सायलीने त्यांना सांगितले. लक्ष्मण यांनी हसत हसत घे फाशी असे म्हणात निघून गेले. त्यानंतर सायलीने लक्ष्मण यास भीती घालण्यासाठी घरामध्येच महालक्ष्मीच्या समोरच गळफास गळ्यात अडकविला, मात्र तिचा त्यातच प्राण गेला. हा प्रकार सायलीच्या मृत्यूनंतरच कुटुंबियांना समजला. तिची प्राणज्योत मावळल्याने काठमाेरे कुटुंबावर दुखाचा डाेंगर काेसळला. दरम्यान या घटनेची माहिती पाेलीसांना देण्यात आली. घटनास्थळी बामणी पोलीस स्टेशनचे कृष्णा घायवट (सपोनी), जमादार सुभाष चव्हाण ,जमादार वसंत निळे यांनी पंचनामा करून मयत सायलीचे शविच्छेदन (22 सप्टेंबरला) जिंतूर येथील शासकीय दवाखाना येथे केले. सायलीच्या आई-वडिलांचे जबाब बामणी पोलिसांनी घेतले. त्यामध्ये त्यांनी आक्षेप न घेतल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.