अकोला : वृत्तसंस्था
अकोला शहरातील विवाहितेच्या परिस्थितीचा फायदा उचलून आणि तिला विविध प्रकारचे आमिषे दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
एका ३६ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार ६५ वर्षीय वृद्धाने शहरातील एका भागात कंपनी सुरू करून कार्यालय थाटले होते. कंपनीमध्ये विवाहिता कामाला होती. कार्यालयात कोणी नसल्याचे पाहून वृद्ध तिच्याशी लगट करायचा. वृद्ध तिला नवनवीन वस्तू खरेदी करून द्यायचा. त्यामुळे विवाहितेशी वृद्धाची जवळीक वाढत गेली. कार्यालयात तो अश्लील चाळे करायचे. त्यालाही विवाहितेची मूकसंमती असायची. त्यामुळे वृद्धाची हिंमत वाढली. त्याने तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. विवाहितेला न सांगता, लॅपटॉपमध्ये व्हिडीओ काढायचा. नंतर वृद्धाची कंपनी बुडाली. विवाहितेने नोकरी सोडली. त्यानंतरही तो तिला संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायचा. व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. वृद्धाचा त्रास असह्य झाल्याने, विवाहितेने पोलिस ठाणे गाठले